Connect with us

मराठी कलाकार

संग्राम आणि खुशबूने बांधली लग्नगाठ। रंगला विवाहसोहळा

Gossips

संग्राम आणि खुशबूने बांधली लग्नगाठ। रंगला विवाहसोहळा

sangram-khushbu-marriage-photo

‘तुमच्यासाठी काय पण’ ह्या आयकॉनिक टॅगलाईनचा जनक संग्राम साळवी आणि बऱ्याचशा हिंदी, मराठी मालिकांमधून भेटीस आलेली अभिनेत्री खुशबू तावडे हि जोडी नुकतीच विवाहबद्ध झाली. मागील वर्षी एप्रिलमध्ये हे दोघे एँगेज झाले होते. ह्या सोहळ्याला बऱ्याच मराठी तारे तारकांनी हजेरी लावली होती. सुयश टिळक, अभिज्ञ भावे, नम्रता आवटे, इत्यादी कलाकारांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. खुशबूची बहीण कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ फेम तिथीक्षा तावडे सुद्धा सोहळ्याला हजर होती.

sangrap-khushboo-tawde-dombilivli

संग्राम तर स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ ह्या मालिकेतून पूर्वीच घराघरांत पोचला होता. पुढे तो झी मराठीवरील ‘गुलमोहर’ मधून आपल्याला भेटला. खुशबू बाबत बोलायचं झालं तर ती आपल्याला मराठी, हिंदी अशा दोन्ही मालिकांमधून दिसली आहे. ‘सिंहासन बत्तीशी’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ सारख्या हिंदी तर ‘पारिजात’, ‘तू भेटशी नव्याने’ ह्या गाजलेल्या मराठी मालिकांमधूनसुद्धा भेटली आहे.

sangram-photo

Comments
Continue Reading
You may also like...

More in Gossips

Like Us on Facebook

Popular Posts

To Top