Connect with us

मराठी कलाकार

अभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत! ‘संजय दत्त प्रोडक्शन’हाऊसचा मराठी सिनेमा.

News

अभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत! ‘संजय दत्त प्रोडक्शन’हाऊसचा मराठी सिनेमा.

हल्लीच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने स्वतःचे संजय दत्त प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून या निर्मिती संस्थेतून तो पहिली मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची बातमी आली आहे. खुद्द संजूबाबानेच याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. आमीर खान, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान या बॉलिवूड स्टार्सनीही अनेक वर्षे बॉलिवूड मध्ये गाजवल्यानंतर स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालू केले आहेत आता त्या यादीत संजय दत्तचे नाव सामील झालं आहे.

त्याची निर्मिती असलेला पहिलावहिल्या सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असतील. याविषयी माहिती देताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये संजय दत्तने लिहिलंय की,’संजय दत्त प्रोडक्शन अंतर्गत पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती करतो आहे, हे सांगताना खूप आनंद होत आहे. अद्याप सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही. ब्लूमस्टांग क्रिएशन्स सहनिर्मिती करीत असून या सिनेमाचे दिग्दर्शन राज गुप्ता करणार आहेत. यात दीपक डोबरियाल, नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्रांजन गिरी व आर्यन मेघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे’.

Comments

More in News

To Top