Connect with us

मराठी कलाकार

आता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.

News

आता अभिनयाची जुगलबंदी रंगवणार संजय जाधव,पहा ‘सूर सपाटा’सिनेमातील खलनायकी अंदाज.

मराठी मनोरंजन क्षेत्राला लाभलेला एक हुकमी एक्का, ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवणारे दिग्दर्शक, युवा पिढीला आकर्षित करणारी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सारख्या मालिकांचे ट्रेंडसेटर म्हणजे संजय जाधव. लेखन, दिग्दर्शन आणि आत्ता अभिनयक्षेत्रातही आपलं लक आजमावण्यासाठी संजय जाधव सज्ज असून ‘सूर सपाटा’ या मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच ते एक भूमिका साकारणार आहेत. आणि विशेष म्हणजे कुठल्या नायकाची वा अन्य भुमिका नसून चक्क या सिनेमातील खलनायक ते साकारणार आहेत.

गावखेड्यातील उनाडटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमांचकारी प्रवास रेखाटणाऱ्या ‘सूरसपाटा’मध्ये संजय जाधव एक सरप्राईझ एलिमेंट म्हणून दिसतील. आता पर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत या चित्रपटामध्ये साकारलेली ‘कबड्डी प्रशिक्षक- शंकर जगदाळे’ची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशीच आहे. खेळांवर आधारित चित्रपट तसे एकूणच कमी पाहायला मिळतात, मराठीत तर त्याहून क्वचित. अशातच जयंत लाडे प्रेक्षकांसाठी एक अस्सल मातीतला खेळ ‘कबड्डी’ घेऊन येत आहेत. कबड्डीला आज अनन्यसाधारण महत्त्व आलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कबड्डीची दखल घेतली गेलेली आहे. याला अनुसरूनच ‘सूर सपाटा’ची कथा मंगेश कंठाळे यांनी बांधली आहे.

अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कारविजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका ‘सूर सपाटा’मध्ये आपल्याला पहायला मिळतील. येत्या २२ मार्चपासून ‘सूर सपाटा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in News

To Top