Connect with us

मराठी कलाकार

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा पडला थाटात पार. पहा फोटोज.

News

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा पडला थाटात पार. पहा फोटोज.

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हे वाक्य आपल्याला नविन नाही, दिवसातून अनेकदा आपण ते ऐकतो. पण, या वाक्याशी निगडीत असलेला धम्माल विनोदी मराठी चित्रपट म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाच्या संगीताचा प्रकाशन सोहळा मुंबई येथील फोर सिझन हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. ह्या दिमाखदार सोहळ्याला सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, संगीतकार पंकज पडघन, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटर आशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
गायक आदर्श शिंदे, सौरभ साळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भव ओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकर यांनी सिनेमातील गाणी गायली असून पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे. ‘दिलाची तार’, गडबडे बाबा, ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशी एकूण पाच गाणी या चित्रपटात आहेत. प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकर यांनी प्रस्तुत केला आहे. या मनोरंजक चित्रपटात महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत, गौरव मोरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हा चित्रपट ११ जानेवरी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top