Connect with us

मराठी कलाकार

रहस्यमयी “सविता दामोदर परांजपे”चा ट्रेलर लॉन्च. जॉन अब्राहम करतोय मराठी सिनेमा निर्मिती. पहा ट्रेलर.

Movie Teaser

रहस्यमयी “सविता दामोदर परांजपे”चा ट्रेलर लॉन्च. जॉन अब्राहम करतोय मराठी सिनेमा निर्मिती. पहा ट्रेलर.

बॉलिवूड सिनेमांतून यशाची शिखरे गाठल्यानंतर आता अभिनेता जॉन अब्राहमला मराठी सिनेमाचे वेध लागल्याचं दिसतंय. कारण कि नुकताच सुबोध भावे आणि तृप्ती तोरडमल यांची मुख्य भूमिका असलेला रहस्यमयी “सविता दामोदर परांजपे”चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. आणि ह्या सिनेमाची निर्मिती जॉन अब्राहम करत असल्याचं दिसतंय. 80 च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर आधारित असलेल्या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी जॅानने स्वीकारली आहे. सिनेमात पती-पत्नीच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे आणि दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल असून त्यांना राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हसकर आणि सविता प्रभुणे हे कलाकारही आपल्याला बघायला मिळणार आहेत.

पहा ट्रेलर:-

दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं असून त्यांची कन्या तृप्तीसुद्धा वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन अभिनयाचा वारसा पुढे नेणार असल्याचं दिसतंय. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृप्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जॉन अब्राहमला जेव्हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाबद्दल आणि त्यावर आधारित असलेल्या चित्रपटाबद्दल सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी व्हायला तयार झाल्याचं तृप्ती म्हणाली. सदर सिनेमा एका प्रसिद्ध नाटकावर आधारित असून ‘सविता दामोदर परांजपे’ हे शेखर ताम्हाणे दिग्दर्शित नाटक 1985 मध्ये रंगभूमीवर आलं होतं. मनाचा थरकाप उडवणारं हे नाटक त्या काळातील रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. ह्या नाटकात राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांच्या प्रमुख भूमिका राहिल्या होत्या.

सिनेमाचा ट्रेलर दमदार असून येत्या 31 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

More in Movie Teaser

To Top