Connect with us

मराठी कलाकार

असा आहे जितेंद्र जोशी ते “सेक्रेड गेम्स”मधल्या काटेकरपर्यंतचा रंजक प्रवास.

Featured

असा आहे जितेंद्र जोशी ते “सेक्रेड गेम्स”मधल्या काटेकरपर्यंतचा रंजक प्रवास.

देशभरात धूम गाजवत असलेल्या “सेक्रेड गेम्स” वेबसिरिजमध्ये मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीने काटेकरची भूमिका साकारली होती. आता हि वेबसिरिज जितेंद्र जोशीला कशी मिळाली याची कथा अतिशय रंजक आहे. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली आहे. गणेश गायतोंडे, सरजात सिंग, काटेकर या सगळ्याच प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनलेल्या व्यक्तिरेखासमवेत १५ ऑगस्टला सेक्रेड गेम्स २ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र जोशीने या वेबसिरिजमधील त्याच्या निवडीचा किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, मी माझ्या मंदार गोसावी या मित्रासोबत गप्पा मारत रस्त्यावर उभा होतो. आम्ही खूप वेळ तिथेच गप्पा मारत असल्याने अखेरीस आम्ही त्याच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही मस्त जेवलो. गप्पा मारल्या. या गप्पा मारत असतानाच मंदारने सांगितले की तो नेटफ्लिक्सवरील एका वेबसिरिजसाठी कास्टिंग करतोय. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यावेळी हे नेटफ्लिक्स म्हणजे काय हेच मला माहीत नव्हतं. त्यावर त्याने मला सांगितले की, ‘सेक्रेड गेम्स’या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने हे एका वेबसिरिजची निर्मिती करत आहेत. त्या दोघांची नावे ऐकताच मी ऑडिशनला जायचा विचार केला.

या सिरीजमधील रोलबद्दल त्याला विचारले तर त्याने मला सांगितले की, एका हवालदाराच्या भूमिकेसाठी सध्या ऑडिशन सुरू आहे. तू ते ऑडिशन दे… त्यावर मी लगेचच म्हटलं की, नको रे. कारण मराठी कलाकारांना नेहमीच अशाच दुय्यम प्रकारच्या भूमिका दिल्या जातात. मराठीतली काही मोजकी नावे सोडली तर कोणालाच हिंदीत चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. माझे हे बोलणे ऐकल्यावर मंदारने मला समजावले की, ही भूमिका खूपच चांगल्या आहे आणि त्याचमुळे मी ऑडिशन देण्यासाठी तयार झालो. मी त्यानंतर काहीच दिवसांत काटेकर या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि त्यात माझी निवड देखील झाली.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top