Connect with us

मराठी कलाकार

पावसामुळे होतंय “ह्या”मालिकांचं शूटिंग रद्द!जाणून घ्या फिल्मसिटीची स्थिती.

News

पावसामुळे होतंय “ह्या”मालिकांचं शूटिंग रद्द!जाणून घ्या फिल्मसिटीची स्थिती.

हल्ली मुंबईकरांची लाईफलाईन पावसामुळे ठप्प झाली असून बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारा मुंबईकर आज स्थिरावला आहे. मात्र, यामध्ये केवळ मुंबईकरांच्या स्पीडला ब्रेक लागला नसून याचा फटका सेलिब्रिटींना देखील बसला आहे. मुंबईत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्या मालिकांचे शूट रद्द झाले आहे. त्यामुळे आज बघणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईत शूट होणाऱ्या बहुतांश मराठी मालिका गोरेगावमधील फिल्मसिटी किंवा मढच्या सेटवर होत असतात. तर बरेच शूट हे ठाण्यात देखील पार पडतात. मात्र, सोमवार रात्री पासून कोसळणाऱ्या पावसाचा फटका मालिकांना बसला आहे. अनेक मालिकांचे शूट रद्द केले गेले आहे. माझ्या नवऱ्याची बायको‘, ‘हम बने तुम बने‘, ‘घाडगे अँण्ड सून‘, ‘फुलपाखरु‘, ‘वर्तुळ‘, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण‘ या मालिकांचे शूट रद्द करण्यात आले.

विशेष गोष्ट म्हणजे ‘हम बने तुम बने‘ मालिकेला तर चक्क दोन दिवस सुट्टी दिली गेलीय आहे. तर माझ्या नवऱ्याची बायकोचे शूट सुद्धा आज रद्द करण्यात आले आहे. त्याचसोबत वर्तुळ मालिकेचे शूटही रखडले आहे. तसेच गोरेगावात चालणाऱ्या बाळू मामाच्या नावाने चांगभले मालिकेला सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मढमध्ये चालणाऱ्या ‘एक घर मंतरलेले‘ मालिकेचे देखील शूट रद्द करण्यात आले आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top