Connect with us

मराठी कलाकार

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री

Television

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची बिगबॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्री

बिगबॉस मराठीमध्ये सध्या बऱ्याच घटना वातावरण ढवळून काढतायत. बिगबॉसने दिलेलं मर्डर मिस्टरी टास्क, त्रुतुजाचं घर सोडून जाणे, सई, मेघा आणि पुष्करच्या मैत्रीत आलेला दुरावा आणि नवीन वाईल्ड कार्ड एंट्री अशा अनेक गोष्टी चाहत्यांना बघायला मिळतायत. घरामध्ये टिकून राहण्यासाठीची चुरस दिवसेंदिवस वाढतच चालली असतांना जवळच्या मित्र मैत्रिणींत आपल्याला फूट पडतांना दिसत आहे. मागील एपिसोडमध्ये भरलेल्या ग्रामपंचायतीत स्मिता गोंदकर आणि सई लोकूर ह्या दोघींच्या स्पर्धेत पंचांनी स्मिताला वाचवल्यामुळे सई प्रचंड संतापली. तिच्या जवळच्या मंडळींवर तिने आगपाखडही केली. आणि चक्क तिने मेघा आणि पुष्करशी बोलणं सोडून दिलं आहे. आता ह्यामुळे आणि त्रुतुजाच्या घर सोडून जाण्यामुळे आऊ, मेघा, पुष्कर ह्यांचा ग्रुप दुबळा पडतांना दिसत आहे. दुसरीकडे विरुद्ध ग्रुपला हर्षदा खानविलकर ह्यांच्या येण्याने चांगलाच फायदा झालेला सध्या दिसतोय.

आता वेळ आलीये ती एका नव्या वाईल्डकार्ड एंट्रीची! आणि घरातील नव्या सदस्याच्या रुपात आपल्याला अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत पाहायला मिळणार आहे. २३ मे रोजी होणाऱ्या भागात आपल्याला हि एंट्री पाहायला मिळेल. शर्मिष्ठा पहिल्या एपिसोडपासून बिगबॉस मराठी फॉलो करत असल्याचं कळतंय. तिच्या येण्यानंतर ती सई, मेघा, पुष्कर आणि आऊ ह्यांचा ग्रुपला सपोर्ट करेल असं शर्मिष्ठा राऊतची बहिण सुप्रिया हिने टाइम्सऑफइंडियाशी बोलतांना सांगितलं. “एक प्रेक्षक म्हणून बिगबॉस पाहतांना आऊ, पुष्कर, सई आणि मेघा हि मंडळी पॉसिटीव्हपणे हा खेळ खेळत असल्याचं दिसतंय, आणि आपली बहीण शर्मिष्ठासुद्धा एनर्जेटिक आणि पॉसिटीव्ह असल्याने ती त्यांच्याच ग्रुपच्या बाजूने असेल. घरात ती कुठल्या स्ट्रॅटेजीने उतरणार नसून बाहेरील जग तिला तिच्या स्ट्रेटफॉरवर्ड इमेजमुळे ओळखतं आणि घरात गेल्यानंतरही ती त्याचप्रमाणे वागेल.” असंही सुप्रिया ह्यावेळी म्हणाली.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top