Connect with us

हिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’। टिझर झाल लॉन्च

Movie Teaser

हिट आणि उत्सुकता दोन्हीही वाढवतोय ‘शिकारी’। टिझर झाल लॉन्च

shikari marathi movie teaser poster

मराठी सिनेमाने वेगवेगळ्या विषयांवर दमदार भाष्य केलं आहे. साचेबद्धपणा सोडून प्रशंसनीय सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. सध्या अश्याच वेगळेपणामुळे जोरदार चर्चेत आहे तो महेश मांजरेकरांचा आगामी ‘शिकारी’. नुकतंच सिनेमाचं टिझर लॉन्च झालं आहे आणि ह्या टिझरने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. मराठीत आलेला हा काही पहिलाच बोल्ड सिनेमा नाही पण त्या सगळ्यांमध्ये ‘शिकारी’ ने स्वतःचे वेगळेपण जपले आहे.

शिकारी नेमका ऍडल्ट, सेक्स कॉमेडी किंवा गंभीर सामाजिक चित्र दाखवतो ह्याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता ताणली आहे. सिनेमाचं जेव्हा पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हासुद्धा एवढ्या बोल्ड अदा देणारी अभिनेत्री कोण? हा प्रश्न सर्वांना पडला होता. सिनेमात अभिनेत्री नेहा खानने भुमिका साकारली असून तिने याअगोदर हिंदी, मल्याळम सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. सिनेमाची निर्मिती आर्यन ग्लोबल एन्टरटेनमेन्टचे विजय पाटील हे करत असून दिगदर्शनाची धुरा बहुआयामी व्यक्तीमत्व विजू माने सांभाळत आहेत. सिनेमातील इतर कलाकारांची नावं अजूनतरी कळू शकलेली नाहीत. आता इतकी उत्सुकता शिगेला पोचवल्यानंतर हा शिकारी एप्रिल मध्ये किती हिट वाढवतो हे आपल्याला लवकरच दिसेल.

 

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top