Connect with us

शिकारीच्या बोल्ड पोस्टरवरचे पाय नेहा खानचे

Neha Khan

Gossips

शिकारीच्या बोल्ड पोस्टरवरचे पाय नेहा खानचे

‘शिकारी’ ह्या महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमातील सस्पेन्स ठेवलेल्या एकएक व्यक्तिरेखा आता बाहेर पडत आहेत. सिनेमाचं पहिलं पोष्टर बघितलं तर त्यात एका अभिनेत्रीचे उघडे पाय दाखवण्यात आले होते. अतिशय बोल्ड असं हे पोष्टर ठरलं होतं. पण त्यातील अभिनेत्री कोणती आहे हे कळतं नव्हतं. पण ती अभिनेत्री नेहा खान असल्याचं आता स्पष्ट होतं आहे. हो! हो! त्या पोष्टरवरील पाय हे नेहा खानचे असल्याचं समोर येत आहे.

नुकतंच अभिनेत्री नेहा खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘या एप्रिलमध्ये हिट वाढणार’ अशी पोस्ट शेअर केली आहे. तिने असंच कॅप्शन फेसबुकला सुद्धा शेअर केलं आहे. अजून दुसरी बाजू बघायची झाल्यास गेल्या वर्षीच नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटहून महेश मांजरेकर ह्यांच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला होता. आणि ह्यामध्ये तर तिनी स्पष्टपणे सिनेमाचं नावसुद्धा घेतलं होतं. एकंदरीत बोलायचं झालं तर सिनेमात मुख्य भुमिका नेहा खानची आहे. महेश मांजरेकर ह्यांच दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रत्येक काम वाखाणण्याजोगं राहिलेलं आहे. त्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांनी नेहमीच प्रतिसाद दिला आहे. आता त्यांच्या आगामी ‘शिकारी’बद्दल सुद्धा अशीच उत्सुकता लागून राहिली आहे.

Neha Khan

Neha Khan

Neha Khan

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Gossips

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top