Connect with us

एप्रिल मध्ये हिट वाढवणार महेश मांजरेकरांचा ‘शिकारी’

Shikari-Marathi-Movie

News

एप्रिल मध्ये हिट वाढवणार महेश मांजरेकरांचा ‘शिकारी’

गेल्या काही दिवसांपूर्वी एका मराठी सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. अतिशय बोल्ड असलेल्या ह्या पोस्टरवर कुठल्या सिनेमाचं मात्र नाव नव्हतं. ‘एप्रिल मध्ये हिट वाढणार’ अशी टॅगलाईन पोस्टरवर झळकत होती. मात्र अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. फक्त महेश मांजरेकरांचा हा सिनेमा आहे एवढंच पोस्टरहून कळत होतं. पण आता हा सिनेमा कुठला आहे हे सगळ्यांच्या समोर आलं आहे.

सिनेमाचं नाव शिकारी असं आहे. आणि सिनेमा 20 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. मराठी सिनेमात याआधी जे बघायला नाही मिळालं ते ह्या सिनेमांत बघायला मिळतं कि काय? असंच सध्या वाटायला लागलयं. नुकतंच सिनेमाचं नाव आणि दुसरं ऑफिशियल पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. सिनेमाची कास्ट कदाचित सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर, प्रसाद ओक ह्यांपैकी असण्याची शक्यता आहे. पोस्टर बारकाईने निरखून पाहिल्यास सिद्धार्थ जाधवची धुसरती छटा आपल्याला दिसते. पण अजूनही ऑफिशियली नेमकी कोणती स्टारकास्ट आहे हे कळलेलं नाही. विजू माने हे सिनेमाचे दिग्दर्शक अजून महेश मांजरेकर मुव्हीज ह्या मोठ्या नावाखाली सिनेमा बनत आहे. निर्मिती विजय पाटील करत आहेत. असला सिनेमा मराठीत पाहणं औत्सुक्याचं ठरणार असला तरी हि हिट आपल्यापर्यंत पोचायला अजून बराच वेळ आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top