Connect with us

बहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस

Movie Trailers

बहुप्रतिक्षित शिकारी प्रदर्शनाच्या वाटेवर – २० एप्रिलला येतोय भेटीस

पोस्टर आणि टिझर लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित शिकारी शेवटी ह्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. वेगळ्या वाटेवरील कथांची निवड करण्यात पारंगत असलेल्या महेश मांजरेकरांची हि निर्मिती असून दिगदर्शन प्रख्यात दिगदर्शक विजू माने ह्यांनी केले आहे. सिनेमाविषयी माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद शिकारी च्या टीमने घेतली होती. सिनेमांत सुव्रत जोशी, नेहा खान, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, कश्मिरा शाह, मृन्मयी देशपांडे, वैभव मांगले, भारत गणेशपुरे, भालचंद्र कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे. सुव्रत आणि नेहा सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ह्या सिनेमातून नेहा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

 एका वेगळ्याच विषयावरचं हे कथानक असल्याने त्यात काम करतांना मजा आली, सिनेमा पूर्णतः व्यावसायिक आणि विनोदी असून तो विनोदाचे बादशहा दादा कोंडकेंना वाहिलेली मानवंदना आहे असं महेश मांजरेकर म्हणाले. स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांच्या जंगलात अडकलेल्या देखण्या हरणाची गोष्ट असं सिनेमाचं थोडक्यात वर्णन करता येईल असं विजू माने ह्यावेळी म्हणाले. मनोरंजन आणि सामाजिक भाष्य करणारा शिकारी ह्या 20 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top