Connect with us

मराठी कलाकार

‘लागिरं झालं जी’मधील शीतलीच्या अदा लावतील तुम्हाला वेड.पहा फोटोज.

Photos

‘लागिरं झालं जी’मधील शीतलीच्या अदा लावतील तुम्हाला वेड.पहा फोटोज.

आज्या आणि शीतलीची ‘लागिरं झालं जी’ मालिकेतली प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली. या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका जरी संपली असली तरी देखील या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. शिवानी पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे. शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकताच तिने निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.

इंस्टाग्रामवर शिवानी बावकरने साडीतील फोटो शेअर करून लिहिलं की, “मौसम का जादू है मितवा…”. तिचं म्हणणं आहे कि, “मला अभिनय करायचा आहे मग तो टीव्ही असो किंवा इतर कुठलंही माध्यम. शीतलच्या भूमिकेने मला काम करण्याचं समाधान दिलं आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता मी जी भूमिका स्वीकारली आहे ती शीतलच्या अगदी विरुद्ध आहे. शूटिंगच्या वेळी मला फार त्रास होत नाही. हा सगळा माहोल आणि काम आवडतंय म्हणूनच मी हे करतेय.”

लोकप्रिय मालिका संपल्यानंतर आपला आवडता कलाकार पुन्हा कोणत्या भूमिकेत दिसणार या विषयी चाहत्यांना उत्सुकता असते. टीव्ही कलाकार मालिका संपल्यावर नाटक किंवा चित्रपटाकडे वळताना दिसतात. झी मराठीवरील आगामी आलटी पालटी या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत चमकणार असून यात ती एक ठग म्हणून दिसेल. मालिका आणि मालिकेतील इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top