Connect with us

मराठी कलाकार

श्रेया बुगडेची लव्ह स्टोरी काही औरच आहे बरं का!

Shreya Bugde

Gossips

श्रेया बुगडेची लव्ह स्टोरी काही औरच आहे बरं का!

कसे आहात सगळे? एकदम व्यवस्थित आहात ना? आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसताय नं? हसायलाच पाहिजे! यावरूनच तुम्हाला कळलं असेल आपण कोणत्या कार्यक्रमाविषयी बोलतोय ते. हे महाराष्ट्राच्या कानी पडणारं चला हवा यऊ द्या या खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमाच्या अँकरचं म्हणजेच निलेश साबळेंच वाक्य. हा कार्यक्रम कमी कालावधीतच थेट प्रेक्षकांच्या ह्रदयाला जाऊन भिडला आणि रसिकप्रेक्षकांनी सुद्धा याला जोरदार दाद दिली. कदाचित यामुळेच कि काय हा कार्यक्रम सातासमुद्रापार गेला. या कार्यक्रमातील भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, निलेश साबळे हि मंडळी तर आता प्रत्येकाला परिवारासारखी झाली आहे. या सगळ्यांमध्ये आणखी एक नाव बाकी आहे ते म्हणजे श्रेया बुगडे हिचं. श्रेयाने एक ना अनेक भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि ती सगळ्यांची आवडती होऊन गेली आहे.

पण श्रेयाच्या खासगी आयुष्यात बघायचं झालं तर ती आहे मुळात महाराष्ट्राची मुलगी पण आता असलेली गुजरातची सून! डिसेंबर २०१५ मध्ये निखिल सेठ आणि श्रेया बुगडे यांचा विवाह संपन्न झाला होता. ती मुळात महाराष्ट्रात वाढलेली, आणि एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली आणि जवळीक वाढली. नंतर पुन्हा काही मतभेदांमुळे दोघं दूर गेली. पण जास्त वेळ हे दूर राहू शकले नाहीत. एकदा निखिलच्या गाजलेल्या मालिकेविषयी अभिनंदन करायला श्रेयाने त्याला फोन लावला आणि त्याच काळात निखीलच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. आणि निखिलला ती अजूनही सिंगल आहे हे कळल्यावर त्याने फार वेळ न दवडता तिला प्रपोज केलं आणि श्रेयाने सुद्धा त्याला होकार दिला.घरच्यांच्या संमतीने त्यांचा विवाह नंतर पार पडला. आणि कधीकाळी दुर गेलेली दोन हृदय परत जवळ आली. ते म्हणतात ना रब ने बना दि जोडी अगदी तशीच!

Comments
Continue Reading
Advertisement
You may also like...

More in Gossips

To Top