Connect with us

मराठी कलाकार

श्रेयस तळपदे झळकतोय या आगामी मराठी सिनेमात.

News

श्रेयस तळपदे झळकतोय या आगामी मराठी सिनेमात.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि अखंड वारकरी समुदायाच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित सिनेमाची सध्या सवर्त्र जोरदार चर्चा सुरु आहे. कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा असणाऱ्या माउलीचे मनुष्य रूप दाखवणाऱ्या ‘विठ्ठल ‘या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाच्या टीझरमधून आपल्याला श्रेयस तळपदेची झलक बघायला मिळत असल्याने मराठी सिनेमातील त्याच्या भूमिकेबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन तसेच टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टीजर मध्ये सुरुवातीला भव्यदिव्य विठ्ठलाची मूर्तीस ढोल ताशाच्या गजरात वंदन करताना श्रेयस तळपदे दिसत आहे.

‘विठ्ठल ‘या सिनेमातून हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्री देखील आपल्याला पाहायला मिळणार असून विठ्ठलाच्या भूमिकेत सचित पाटील दिसणार आहे. तसेच अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे. सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून,दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा सिनेमा ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Comments

More in News

To Top