Connect with us

मराठी कलाकार

श्रिया पिळगांवकर झळकतेय ब्रिटिश टीव्ही सिरीजमध्ये. राजस्थानात चालू आहे शूटिंग.

Actress

श्रिया पिळगांवकर झळकतेय ब्रिटिश टीव्ही सिरीजमध्ये. राजस्थानात चालू आहे शूटिंग.

जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणजे सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू आणि दिग्गज व्यक्तिमत्व. अनेक मराठी, हिंदी सिनेमे, रिएलिटी शो यांच्याद्वारे ते प्रेक्षकवर्गाचे आवडते झाले. त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांचंही सिनेसृष्टीतील कार्य अगदी वाखण्याजोगंच आहे. आता आपल्या पालकांच्या पाऊलावर पाऊल ठेवायला सचिन आणि सुप्रिया यांची कन्या श्रिया पिळगांवकरसुद्धा तयार झाली असल्याचं दिसतं आहे. आगामी ब्रिटिश टीव्ही सिरीजमध्ये श्रिया झळकणार असून त्याच्या शूटिंगसाठी ती राजस्थानला असल्याचं कळतं आहे.

बीचम हाऊस या सिरीजमध्ये ती अभिनय करणार असून ती एक चंचल भुमिका साकारत आहे. अभिनयात पदार्पण करताना श्रियाने वडिलांसोबत ‘एकुलती एक’ सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. पुढे ती शाहरुख खानच्या फॅन सिनेमातसुद्धा झळकली होती. तिचा पहिला पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सिनेमा सुद्धा राजस्थानातच शूट झाला असून आता दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिरीजसाठी पुन्हा एकदा राजस्थानातच आल्याने श्रिया आनंदात आहे. राजस्थानातील गुलाबी शहर जयपूर मध्ये सध्या हे शूटिंग चालू असल्याचं कळतं आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

To Top