Connect with us

मराठी कलाकार

आगामी ‘शुभ लग्न सावधान’ मधील ‘ओ साथी रे’ भावनिक गाणं. सुबोध भावे आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत.

Featured

आगामी ‘शुभ लग्न सावधान’ मधील ‘ओ साथी रे’ भावनिक गाणं. सुबोध भावे आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत.

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेला अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील ‘ओ साथी रे’ हे भावनिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईट्सवर लाँच करण्यात आले असून हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडेचा आवाज लाभला आहे.

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. सिनेमातून लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच, हा ट्रेलर पाहताना, ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ येत्या 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

पहा ट्रेलर:-

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Featured

To Top