Connect with us

मराठी कलाकार

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप.पहा “मिस यू मिस्टर”सिनेमाचा ट्रेलर.

Movie Trailers

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडेची लाँग डिस्टन्स रिलेशनशीप.पहा “मिस यू मिस्टर”सिनेमाचा ट्रेलर.

‘अग्निहोत्र’ या मालिकेतील सुपरहिट जोडी म्हणजे सई आणि नीलची. ही जोडी तब्बल १० वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावर सोहळा पार पडला. मिस यू मिस्टर २८ जूनला प्रदर्शित होणार आहे. या प्रसंगी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांच्या गाण्याने सोहळ्यात बहार आणली.

काय आहे ट्रेलरमध्ये?

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिध्दार्थ चांदेकर ‘वरूण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवविवाहीत जोडप्यांच्या भुमिकेत आहेत. वरूणला लग्नानंतर कामानिमित्त काही दिवस लंडनला जावे लागते. आणि सुरू होतं लाँग डिस्टशन्स रिलेशनशीप. सुरूवातीला जरी छान दिवस गेले असले तरी काही दिवसांनी यामुळे या दोघांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यातून ते दोघे कसा मार्ग काढणार हे बघणं महत्त्वाच आहे.

‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर या ट्रेलरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top