Connect with us

मराठी कलाकार

पहा सिद्धार्थ चांदेकरच्या साखरपुड्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

Photos

पहा सिद्धार्थ चांदेकरच्या साखरपुड्याचे एक्सक्लुजिव्ह फोटोज.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’.आणि आता त्याच्या आयुष्यात ‘गुलाबजाम’चा गोडवा आणणारी मिताली आली आहे. म्हणजेच, सिद्धार्थ आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा साखरपुडा पार पडलाय. कुटुंबीय आणि मोजक्‍या मित्रमंडळीच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा साखरपुडा झाला. मुंबईत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. सिद्धार्थनं साखरपुड्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आयुष्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन्स डेला सिद्धार्थने इन्स्टाग्रामवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थने मितालीला प्रपोज करतानाचा एक फोटो शेअर केला होता. ‘मी तिला प्रपोज केलं आणि तिनं होकारही दिला’ असं म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्यानं ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून सिद्धार्थने 2008 साली टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर कशाला उद्याची बात, प्रेम हे यासारख्या मालिकांमध्ये तो झळकला.2010 मध्ये ‘झेंडा’ चित्रपटातून सिद्धार्थने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. जय जय महाराष्ट्र माझा, क्लासमेट्स, सतरंगी रे, वजनदार अशा अनेक चित्रपटांतून त्याने अभिनय केला आहे.

मितालीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. तिने छोट्‍या पडद्‍यावर अनुबंध, फ्रेशर्स यासारख्या काही मालिका केल्या आहेत. नुकतीच ती ‘महाराष्ट्राचे सुपर डान्सर्स’ या रिअलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.

View this post on Instagram

YES YES YES.❤️💯 #happyvalentines #tinypanda

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top