Connect with us

मराठी कलाकार

धक्कादायक!सिद्धार्थ चांदेकरने म्हटले चाहत्यांना अलविदा!

Actor

धक्कादायक!सिद्धार्थ चांदेकरने म्हटले चाहत्यांना अलविदा!

झेंडा, बालगंर्धव, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार यांसारख्या चित्रपटातून खूप चांगल्या भूमिका अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने साकारल्या आहेत. स्टार प्रवाहवरील त्याच्या जिवलगा या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच मालिकेतील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच त्याची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिजदेखील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून ही वेबसिरिज आणि त्यातील सिद्धार्थचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.

सिद्धार्थची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर त्याचे फॅन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पण या सगळ्यात सिद्धार्थने एक वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. तो काही महिने चाहत्यांपासून दूर जात असल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. सिद्धार्थने या पोस्टसोबतच लंडन टाईम असा हॅश टॅग दिला आहे. सिद्धार्थने ही पोस्ट टाकल्यावर त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. तू एवढ्या दिवस कुठे चालला आहेस असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत. तसेच आम्ही तुला खूप मिस करणार असल्याचे देखील ते सांगत आहेत. तसेच त्याच्या या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देखील देत आहेत.

सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, सिटी ऑफ ड्रीम्सला माझ्या चाहत्यांनी जो खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी काहीतरी नवीन करण्यास सध्या उत्सुक आहे. तुम्हाला मी सगळ्यांना 18 महिन्यांनी भेटणार आहे. तोपर्यंत मला मिस करा… अलविदा.

Comments

More in Actor

To Top