Connect with us

मराठी कलाकार

सिद्धार्थ जाधवचं धमाल बर्थडे सेलिब्रेश पाहिलंत का?

News

सिद्धार्थ जाधवचं धमाल बर्थडे सेलिब्रेश पाहिलंत का?

सिद्धार्थ जाधव! मराठीतील आपल्या सर्वांच्या अभिनेत्यांपैकी एक. नुकताच 23 ऑक्टोबर रोजी सिद्धार्थ जाधवचा 37 वा वाढदिवस झाला असून या निमित्ताने आपल्या सर्वांना मोठी धमाल बघायला मिळाली आहे. त्याचं झालं असं कि सिद्धार्थ सध्या आगामी सिम्बा सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आणि त्याचा वाढदिवसही त्याने सिनेमाच्या टीमसोबतच सेलिब्रेट केला. यावेळी अभिनेता रणवीर सिंह, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सिम्बाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या व्हिडिओची सुरूवात ‘बार बार दिन ये आए…’ या गाण्याने झाली आहे. या गाण्यावर सिद्धार्थ आणि रणवीर सिंह नाचताना दिसत आहे. “हा माझ्यासाठी खास दिवस आहे. 13- 14 वर्षांनतर मी पुन्हा एकदा रोहित शेट्टी सरांसोबत काम करत आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे.. I Love You Sir..” असं सेलिब्रेशननंतर सिद्धार्थ आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाला.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top