Connect with us

मराठी कलाकार

एक दोन नव्हे तर तब्बल अकरा मराठी कलाकार झळकणार “सिम्बा”मध्ये! पहा नावे.

Featured

एक दोन नव्हे तर तब्बल अकरा मराठी कलाकार झळकणार “सिम्बा”मध्ये! पहा नावे.

दिग्दर्शक रोहित शेट्टींचा आगामी ‘सिम्बा’ सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची सिनेमात मुख्य भुमिका असणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टींचा सिनेमा म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा असं समीकरण आपल्याला आजवर बघायला मिळालेलं आहे. आता त्यांच्या या आगामी ‘सिम्बा’मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल अकरा मराठी कलाकार काम करतांना दिसणार आहेत. सिध्दार्थ जाधव, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, आणि नेहा महाजन हि सर्व मंडळी आगामी ‘सिम्बा’ सिनेमातून आपल्याला बघायला भेटणार आहे.

याविषयी अधिक बोलतांना हुरहुन्नरी अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला कि “मी बऱ्याचदा मस्करीत म्हणतो, रोहितसरांनी एक मराठी फिल्म बनवलीय ज्यामध्ये रणवीर सिंह आणि सारा अली खान आहेत, रणवीर सिंहसारख्या सुपरस्टार्सने माझा वाढदिवस साजरा करावा, किंवा मला आपल्या लग्नाचे आमंत्रण द्यावे, एवढे मला आपलेसे मानण्याने मी खूप भारावून गेलो आहे. आणि ह्यासगळ्यात दुग्ध शर्करा योग होता, तो म्हणजे मराठी सिनेसृष्टातले अनेक उत्तमोत्तम कलाकार ह्या सिनेमाचा हिस्सा होते.”

अशोक समर्थ यावेळी म्हणतात, “मला माझ्या आयुष्यातली पहिली कमर्शिअल हिट फिल्म पाहायला मिळाली, ती रोहित शेट्टींमूळेच. सिंघममूळे मी 100 कोटी क्लबमध्ये गेलो. सिंघम ते सिंबा हा अविस्मरणीय प्रवास आहे. भारतीय सिनेसृष्टीतला आघाडीचा नट रणवीर सिंहकडून आपल्या अगोदरच्या सिनेमातल्या अभिनयाविषयी कौतुकाची थाप मिळावी, ही माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी तर आनंदाचीच बाब होती. रोहितसरांना मी त्या आघाडीच्या दिग्दर्शकांमधला मानतो, ज्यांना आपल्या नटांकडून चोख परफॉर्मन्स काढून घेता येतो.”

Comments

More in Featured

To Top