Connect with us

मराठी कलाकार

स्मिताच्या पार्टीच्या निमित्ताने बिगबॉस मराठीची सगळी मंडळी पुन्हा एकत्र पण पुष्कर,सई आणि मेघाची पार्टीला अनुपस्थिती!

Television

स्मिताच्या पार्टीच्या निमित्ताने बिगबॉस मराठीची सगळी मंडळी पुन्हा एकत्र पण पुष्कर,सई आणि मेघाची पार्टीला अनुपस्थिती!

बिगबॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकाची विजेती बनली. याच निमित्ताने तिच्या मैत्रिणींनी स्मितासाठी सरप्राईझ पार्टी अरेंज केली होती. ह्या पार्टीला आपल्याला एरव्ही बिगबॉसच्या घरात भांडनतंटे करणारी मंडळी एकमेकांसमवेत एन्जॉय करताना दिसून आली. या धमाकेदार पार्टीला पुष्कर जोग, मेघा आणि सई मात्र हजर नव्हते आणि ही गोष्ट नक्कीच खटकणारी होती. बिग बाॅसच्या फिनालेत स्मिता तिसरी आली. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सिझन सुरु असताना तर सई स्मिताला तू सारखी कन्फ्युज असतेस म्हणून बोलायची. बाहेरही तू कन्फ्युज राहणार सांगायची. एकंदरीत मेघा, सई यांचं स्मिताशी पटत नव्हतं.

आस्ताद, रेशम, आऊ, सुशांत शेलार अश्या सर्वच लोकांनी पार्टीला हजेरी लावली होती. स्मिताची खास मैत्रीण आणि फॅशन डिझायनर रिचाही पार्टीला आली होती. बिगबॉसच्या स्पर्धकांपैकी रेशम टिपणीस असेल, उषा नाडकर्णी असतील, सगळ्यांनी पार्टी एंजाॅय केली खरी. पण पुष्कर, मेघा हे दोन प्रबळ फायनलिस्ट आणि तगडी स्पर्धा देणारी सई पार्टीला का आली नाही, याबद्दल कुजबुज सुरूच राहिली.

 

 

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Television

To Top