Connect with us

मराठी कलाकार

विभक्त कुटुंबाची अनोखी कहाणी.पहा सोहळा सिनेमाचा ट्रेलर.

Movie Trailers

विभक्त कुटुंबाची अनोखी कहाणी.पहा सोहळा सिनेमाचा ट्रेलर.

आजवर विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीस आलेले आहेत. मात्र याच धाटणीवर काहीशी हटके कथा असणारा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर व गजेंद्र अहिरे हे दोघे पहिल्यांदाच या निमीत्ताने एकत्र काम करणार आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा असणार आहे.

के.सी बोकाडिया यांची प्रस्तुत या सिनेमाचं नाव सोहळा असं आहे. मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. विक्रम गोखले, शिल्पा तुळसकर, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहे. अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा हे निर्माते आहेत.

येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. ‘पांस्थथ मी’, ‘तुझ्या माझ्या आभाळाला’, ‘नो प्रॉब्लेम’ या गाण्यांचा आस्वाद आपल्याला या सिनेमात घेता येणार आहे. पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर या गायकांनी सिनेमातील गाणी गायली आहेत.

Comments

More in Movie Trailers

To Top