Connect with us

मराठी कलाकार

भव्य ऐतिहासिक सिनेमातून झळकणार “हि”अप्सरा?वाचा अधिक

Actress

भव्य ऐतिहासिक सिनेमातून झळकणार “हि”अप्सरा?वाचा अधिक

तुम्हाला नटरंग सिनेमातील “अप्सरा आली” हे गाणं आठवतंय का? नक्कीच आठवत असणार कारण हे गाणं बरंच गाजलं होतं. अजय अतुल यांच्या स्वरांच्या साजाबरोबरचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याचा सुरेल साजही या गाण्याला होता. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

सोनालीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. सोनाली लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून हा एक बायोपिक असणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूप वेगळा असणार आहे. सोनालीच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून या चित्रपटाचा विषय कोणता असणार, तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत सोनालीने मौन राखणेच पसंत केले आहे. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. पण तिने अद्याप तरी सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दल काहीही सांगितलेले नाहीये.

नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली या गाण्यानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनालीच्या कारकिर्दीला नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले होते. तिचा नवीन चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात.

 

Comments
Continue Reading
You may also like...

More in Actress

To Top