Connect with us

मराठी कलाकार

सोनालीच्या स्विमिंगपूल मधील मादक अदा.पहा फोटोज.

Photos

सोनालीच्या स्विमिंगपूल मधील मादक अदा.पहा फोटोज.

शूटिंग, फॅन्स, ग्लॅमर हे सगळं सोडून सेलिब्रिटीज मंडळी निवांत मजा अनुभवतांना आपल्याला बऱ्याचदा अनुभवायला मिळतं. आता हेच बघा ना मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही.

या फोटोत सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. सोनाली स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसत आहे. पूलमधील सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. ब्लॅक रंगातील स्विमविअर आणि सोनालीच्या मादक अदा यामुळे या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. नुकतंच सोनाली ती आणि ती या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आली. यांत सोनालीसह बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरेसुद्धा झळकलेत.

सोनाली लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून हा एक बायोपिक असणार असल्याचे म्हटले जात आहे. सोनाली तिच्या भूमिकांच्या बाबतीत नेहमीच चोखंदळ असते. त्यामुळे आता सुद्धा ती एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूप वेगळा असणार आहे. सोनालीच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून या चित्रपटाचा विषय कोणता असणार, तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत सोनालीने मौन राखणेच पसंत केले आहे. सोनाली तिच्या या ऐतिहासिक चित्रपटात कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी तिच्या फॅन्सना काही दिवस तरी वाट पाहावी लागणार.

Comments

More in Photos

Like Us on Facebook

Popular Posts

To Top