Connect with us

मराठी कलाकार

का व्हायरल होतोय सोनाली कुलकर्णीचा “तो”व्हीडीओ?वाचा पूर्ण बातमी.

Actress

का व्हायरल होतोय सोनाली कुलकर्णीचा “तो”व्हीडीओ?वाचा पूर्ण बातमी.

सध्याच्या दिवसांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॉरिशसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. रसिक प्रेक्षकांची लाडकी अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी असंच आपल्याला म्हणावं लागेल. मोठ्या संख्येने तिचे चाहते सोशल मीडियावर तिला फॉलो करतात. सध्या सोनालीचा मॉरिशसमधील एक व्हीडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

नुकताच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली डान्स करताना दिसतेय. मॉरीशसमध्ये ‘सेगा’ डान्स या व्हि़डीओत सोनाली करताना दिसतेय. सोनालीच्या हा व्डिडीओ तिच्या फॅन्सना आवडला आहे. सोनालीचा खास अंदाज या व्हीडीओत दिसत आहे.

नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

Comments

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top