News
जेव्हा अप्सरा बनते सिंघम!वाचा अधिक.
अनेक कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपले अभिनय आणि नृत्यकौशल्य दाखवले आहे. ‘नटरंग’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मितवा’ अशा सुपरहिट मराठी चित्रपटांसोबतच सोनालीने हिंदीतही आपली छाप पाडली आहे. ‘ग्रँड मस्ती’, ‘सिंघम’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. कायमच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना भुरळ पाडत असते. ‘नटरंग’ चित्रपटानंतर प्रकाशझोतात आलेली ही अभिनेत्री लवकरच एका वेगळ्या धडाकेबाज भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं दिसत आहे.
पोस्टसोबतच सोनालीने ‘नेचर डिलाइट’,’लेडीकॉप’असे हॅशटॅग वापरले असून सोनालीच्या चाहत्यांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सोनाली लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून हा एक बायोपिक असणार असल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी ऐकायला आल्या होत्या. एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत सोनाली प्रेक्षकांना पाहायला मिळणार एवढंतरी यानिमित्ताने कन्फर्म झालंय.
