Connect with us

मराठी कलाकार

सोनाली कुलकर्णीचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो घालतायंत फॅन्सना भुरळ.

Actress

सोनाली कुलकर्णीचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो घालतायंत फॅन्सना भुरळ.

प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहून सोनाली कुलकर्णी आपल्या फॅन्ससोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच सोनालीने तिचा लाल साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक चाहत्यांच्या चांगला पसंतीस उतरला आहे. सोनालीच्या या फोटोवर फॅन्सकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या ह्या फोटोंमधून लाल रंगाच्या साडीत तीचे सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचे दिसून येत आहे. लवकरच सोनाली सलमान खानच्या भारत या आगामी सिनेमात दिसणार आहे. सोनालीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली, मात्र यात ती नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले असून सोनालीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.

Comments

More in Actress

Like Us on Facebook

Popular Posts

To Top