Connect with us

मराठी कलाकार

सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन आता घेऊन येतंय ‘सोनी मराठी’!

Television

सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन आता घेऊन येतंय ‘सोनी मराठी’!

हल्ली मराठी टीव्ही चॅनल्सची चलती चांगलीच जोरात असून सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन यात कसे बरे मागे राहील? इंडियनटेलिव्हिजनच्या बातमी नुसार आता सोनी सुद्धा आपलं मराठी चॅनल लवकरच लॉन्च करणार असल्याचं कळतंय. ‘सोनी मराठी‘ असं त्या चॅनलचं नाव असणार आहे. सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजनचं हे दुसरं प्रादेशिक चॅनल असणार आहे. ‘सोनी आठ’ हे याआधी सोनीचं बंगाली भाषेतील एक प्रादेशिक चॅनल आहे. अजय भलवणकर हे सोनीकडून या चॅनलची धुरा सांभाळतील असं चॅनलच्याच सूत्रांकडून समजतंय. हे चॅनल सध्या विकसित अवस्थेत आहे. निश्चित तारीख अजून ठरली नसली तरी ‘सोनी मराठी’ येत्या मार्च पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. हे चॅनल अजय भलवणकरांच्याच देखरेखीत चालणार आहे. ज्या भलवणकरांना सोनीने २०१४ मधेच ‘चीफ क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून जबाबदारी दिली होती.

सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजनने आता देशभरात प्रादेशिक चॅनल मध्ये पाय पसरवण्याचं ठरवलं आहे. आणि सध्या मराठी टीव्ही चॅनल्स ना चांगले दिवस आहेत. ‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’ ह्या चॅनल्सचा चांगलाच मोठा ‘टिआरपी’ आहे. दर्जेदार मालिका, कार्यक्रम, रिऍलिटी शोज, कॉमेडी शोज देऊन ह्या चॅनल्सनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलयं आणि आता ह्यांना स्पर्धा म्हणून आणखी एक मराठी चॅनल ‘सोनी मराठी’ च्या रूपाने येत आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा आधीच फार मोठा विस्तार आहे. सॊनीकडे सध्या सोनी मॅक्स,सोनी टीव्ही, सोनी सब, सोनी पल, सोनी टेन, सोनी HD, अशे भरपूर चॅनल्स आहेत. क्रीडा, हिंदी, इंग्रजी, सिनेमा, म्युझिक चॅनल क्षेत्रात आघाडीवर असलेलं सोनी आता मराठीत पण येतंय हि खूप मोठी बाब आहे. सध्यातरी ‘सोनी मराठी’ साठी कर्मचारी भरतीचं काम चालू असल्याचं कळतंय!

Comments
Continue Reading
Advertisement

More in Television

To Top