Connect with us

मराठी कलाकार

अभिनेता सुबोध भावेचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो पाहिलात का?

Featured

अभिनेता सुबोध भावेचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो पाहिलात का?

सध्या सोशल मिडियावर चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती सुबोध भावेच्या ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या आगामी सिनेमाची. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बड्या कलाकारांची मांदीयाळी दिसत असल्याने सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली असून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद सध्या सिनेमाच्या दोन्ही ट्रेलरला मिळत आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील एक फोटो अभिनेता सुबोध भावेने ट्विट केला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा गंभीर मुद्रेतला सुबोधचा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. “डॉ. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेली “रायगडाला जेव्हा जाग येते” या नाटकातील “छत्रपती संभाजी महाराजांची” भूमिका ही त्यांची अजरामर भूमिका. तो प्रसंग चित्रपटात साकारण्या आधी स्वतःच्या मनाची तयारी.छत्रपती संभाजी महाराजांच्या आशिर्वादानेच हे आव्हान पेलणं शक्य झालं”.असं हा फोटो ट्विट करताना अभिनेता सुबोध भावेने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे. सदर सिनेमात सुबोध भावेसोबतच सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Featured

To Top