Connect with us

मराठी कलाकार

विक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट!घेणार निरोप.

Television

विक्रांत सरंजामेनी केला “तुला पाहते रे”चा शेवटचा एपिसोड शूट!घेणार निरोप.

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सर्व पात्रांनी लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे. या मालिकेने काही कालावधीत उदंड प्रतिसाद मिळवला असून सध्या ही मालिका एका नवीन वळणावर येऊन पोहोचली आहे. जेव्हा ही मालिका सुरु झाली तेव्हा विक्रांतची म्हणजेच सुबोध भावेची प्रेमळ, विश्वासू, आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला एक नायक आणि काही काळानंतर एक खोटारडा, विश्वासघातकी, अशी खलनायकाची भूमिका करणाऱ्या विक्रांत सरंजामे याचा कालचा या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता अशी बातमी आली आहे.

नायक ते खलनायक असा विक्रांत सरंजामेचा प्रवास आता संपला आहे. जरी विक्रांत सरंजामेचे शुटिंग संपले असेले तरी ही मालिका अजून सुरु आहे. अभिनेता सुबोध भावेने सकाळी त्याच्या इन्टाग्राम अकाऊंवरुन पहिल्या दिवसांचा ‘तुला पाहते रे’या मालिकेचे निर्माते अतुल केतकर यांच्या सोबतचा फोटो आणि या मालिकेचा मेकअप रुमचा फोटो शेअर केला आहे. तसेच चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी सुबोध भावे याने इन्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला होता. त्याने लाईव्हमध्ये तुला पाहते रे या मालिकेच्या शुटिंगचा कालचा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले. त्याला सगळ्यांची आठवण येत असल्यामुळे त्याने इन्टाग्रामवर स्टोरी शेअर केली असल्याचे देखील सांगितले.

या लाईव्ह व्हिडिओला प्रेक्षकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. सुबोध भावेच्या अभिनयाबद्दल सगळ्यांनी कौतुक केले. तसेच त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सेटवर आलेल्या अनुभवाबद्दल त्याने या लाईव्ह व्हिडिओमध्ये सर्व काही बोलला आहे आणि पुन्हा एकदा मालिकेच्या शेवटच्या दिवशी मी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाच्या भेटायला येईन असे त्याने सांगितले.

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top