Connect with us

मराठी कलाकार

नवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री!

Television

नवी रहस्य उलगडणार.विक्रांत सरंजामेच्या मुलाची मालिकेत एंट्री!

प्रत्येक मालिकेचा एक टर्निंग पॉईंट असतो आणि त्यामुळे ती मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. त्याचप्रमाणे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेत अव्वल ठरली असून या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत असून विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची वय विसरायला लावणारी ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.

आता या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येत आहे. कथानकातील नवनवीन वळणांमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कामय असून नुकतेच या मालिकेत राजनंदिनीची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तर मंगळवारच्या भागात राजनंदिनीची दमदार एण्ट्री झाली आहे. तिच्यासोबत छोटा जयदीपही झळकला असून हा जयदीप दुसरा तिसरा कोणी नसून सुबोध भावेचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. सध्या ‘तुला पाहते रे’मध्ये फ्लॅशबॅकच्या माध्यमातून जुना काळ दाखवला जात आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे आणि राजनंदिनीची नेमकी कथा काय आहे? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

सुबोध भावेचा मुलगा मल्हार हा छोट्या जयदीपच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगीही झळकली होती. एकूणच बॉलिवूडमध्ये दिसणारा स्टारकिड्सचा ट्रेंड आता मराठी मालिकेतही दिसू लागला आहे.

Comments

More in Television

To Top