Connect with us

मराठी कलाकार

सुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.

बिग बॉस मराठी

सुरेखाताई पडल्या घराबाहेर.बिगबॉस मराठी-२.वाचा पूर्ण बातमी.

आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकनाऱ्या सुरेखाताई यांनी बिगबॉसच्या घरात राहायला आल्यावर सर्वांना परिवाराच्या सदस्याप्रमाणे वागवलं. त्यामुळेच शिवने तर त्यांना आईचा दर्जा दिला होता. पण अखेर काल, बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. या आठवड्यामध्ये हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे नॉमिनेशनमध्ये होते. ज्यामध्ये वैशाली म्हाडे आणि सुरेखा पुणेकर हे डेंजर झोनमध्ये गेले. महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये सुरेखा पुणेकर यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये अतिथी देवो भव: हा टास्क रंगला आणि ज्यामध्ये बिग बॉस मराठी सिझन १ मधील सदस्य घरामध्ये गेस्ट बनून आले. या टास्कमध्ये नेहाच्या टीमने म्हणजेच टीम B ने बाजी मारली. सुरेखाताई घरातून बाहेर पडल्यावर सगळेच सदस्य भावूक झाले. सगळ्या सदस्यांनी सुरेखाताईना मानाचा मुजरा केला.

महेश मांजरेकरांनी एकच फाईट वातावरण टाईट या कार्यामधून सगळ्या सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची वा त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगण्याची संधी दिली. या कार्यामध्ये किशोरी शहाणे आणि नेहाबद्दल सदस्यांना वाटणाऱ्या गोष्टी, राग इतर सदस्यांनी व्यक्त केला. माधवने वीणा आणि नेहा, शिवने नेहा आणि हिना, वैशालीने किशोरी शहाणे आणि नेहा यांना त्यांच्याविषयी वाटणाऱ्या गोष्टी व्यक्त केल्या. रुपाली आणि वीणाने किशोरीताईचे नाव घेतले आणि त्यामुळे सगळ्याच सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तर किशोरी शहाणे यांना देखील खूप वाईट वाटले होते.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top