Connect with us

मराठी कलाकार

सुव्रत जोशी व सखी गोखलेच्या लग्नाचे एक्सलुसीव्ह फोटोज.

Photos

सुव्रत जोशी व सखी गोखलेच्या लग्नाचे एक्सलुसीव्ह फोटोज.

गेल्या काही दिवसांपासून सुव्रत जोशी व सखी गोखले यांच्या लग्नांच्या चर्चेला उधाण आले होते. आता या चर्चाना पूर्णविराम देत अखेर अभिनेत्री सखी गोखले व अभिनेता सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचा विवाह सोहळा पुण्यात पार पडला असून या सोहळ्यातील काही फोटो सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. मेहंदी सेरेमनीदेखील बुधवारी पार पडल्याच कळतं आहे.

सुव्रत आणि सखी गोखले यांनी दुनियादारी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्या दोघांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो किंवा कोणताही इव्हेंट किंवा कॉफी वा सिनेमाला एकत्र जाण्याचे फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी याबाबत स्वतः कधीच खुलासा केला नाही.

या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. हिरव्या रंगाच्या साडीत वधूच्या गेटअपमध्ये सखी गोखले खूपच सुंदर दिसत होती. बुधवारी मेहंदी सेरेमनी पार पडली व त्यानंतर त्यांची सेलिब्रेशन पार्टी देखील पार पडली. यावेळी डान्स करतानाचा त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Comments

More in Photos

To Top