Connect with us

सुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर।आगामी ‘शिकारी’ची स्टारकास्ट

suvrat joshi

News

सुव्रत जोशी झळकतोय मोठ्या पडद्यावर।आगामी ‘शिकारी’ची स्टारकास्ट

सध्या छोट्या पडद्यावरील गुणी कलाकार म्हणजे सुव्रत जोशी. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ह्या घरोघरी पोचलेल्या मालिकेमधून तो सर्वाना परिचयाचा झाला. सुव्रत आता आगामी ‘शिकारी’ मधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेत असल्याचं कळतंय. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सिनेमा आहे. त्यांच्यासोबतच सिनेमात कश्मीरा शाह, मृन्मयी देशपांडे, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव ह्यांच्यासुद्धा महत्वाच्या भुमिका असतील. सुरुवातीला झळकलेल्या बोल्ड पोस्टर्सनंतर सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. महेश मांजरेकर सादर आणि विजू माने दिगदर्शित हा सिनेमा 20 एप्रिलला रिलीज होत आहे.

suvrat joshi

सुव्रत बाबतीत बोलायचं झालं तर तो मुळचा पुण्याचा असून सध्या मुंबईत राहतो. पुण्याच्या एनएसडी चा (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) तो विद्यार्थी आहे. पुणे विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्याने सुरुवातीस शिक्षकाची नौकरी केली पण अभिनयाच्या ओढीने तो तशा संधी मिळवत गेला. अनेक नाटकं, एकांकिकामधून त्याने अभिनय केलेला आहे. बिन कामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम, अमर फोटो स्टुडिओ हि त्याने केलेली काही नाटके आहेत. पुढे झी मराठीवरील गाजलेल्या दिल दोस्ती दुनियादारी मध्येही त्याने अभिनय केला. ह्याच मालिकांमधून घरोघरी पोचलेला सुव्रत आता मोठ्या पडद्यावरही ‘शिकारी’च्या निमित्ताने त्याच्या अभिनयाची चुणूक आपल्याला दाखवायला तयार आहे.

suvrat joshi

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top