Connect with us

मराठी कलाकार

“हि”जेष्ठ अभिनेत्री करतेय तब्बल चौदा वर्षानंतर स्वप्नील जोशीसोबत काम.साकारणार आईची भुमिका.

News

“हि”जेष्ठ अभिनेत्री करतेय तब्बल चौदा वर्षानंतर स्वप्नील जोशीसोबत काम.साकारणार आईची भुमिका.

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या आगामी मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’. या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नील जोशीच्या खंबीर आईची भूमिका नीना कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून पोस्टरमध्ये स्वप्नील जोशी आपल्या आईच्या म्हणजेच नीना कुलकर्णी यांच्या कुशीत झोपल्याचे पाहायला मिळत आहे. हे पोस्टर आई आणि मुलामधील मायेचे, जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत आहे.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई देवधर, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

” आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ” अशी सुंदर टॅगलाईन आपल्याला पोस्टरवर बघायला मिळते आहे.“मी सेटवर काम करत असताना खुश होते कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं, चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्या बरोबर पुन्हा काम करायला मजा आली. ‘मोगरा फुलाला’ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांचादेखील विशेष उल्लेख करेन. त्यांचे विशेष आभार.” असं यावेळी नीना कुलकर्णी सांगतात.

 

Comments
Continue Reading

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top