Connect with us

मराठी कलाकार

“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.

Television

“जिवलगा”मालिकेत मुख्य भुमिकेत झळकणार स्वप्नील, सिद्धार्थ आणि अमृता.

‘चॉकलेट बॉय’ स्वप्नील जोशी, ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच एका मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीहुन जिवलगा ही ग्लॅमरस कलाकारांनी भरलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नातेसंबंधांचे अनेक पैलू ‘जिवलगा’मध्ये उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटेल.

मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे. बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. मालिकेत अनेक आघाडीचे, गुणी आणि लोकप्रिय कलाकार आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, “मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.”

Comments

More in Television

Like Us on Facebook

Popular Posts

To Top