Connect with us

मराठी कलाकार

क्रिकेटरच्या भूमिकेसाठी “चॉकलेट बॉय”स्वप्नीलची कठोर मेहनत.

Actor

क्रिकेटरच्या भूमिकेसाठी “चॉकलेट बॉय”स्वप्नीलची कठोर मेहनत.

चॉकलेट बॉयची इमेज तोडत नवीन वर्षात स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. “मी पण सचिन” या आगामी सिनेमाच्या टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा ‘लुक’ आणि वेगळा आवाज ऐकून तो काहीतरी नवीन करतोय हे नक्की जाणवते. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

‘मी पण सचिन’ सिनेमात स्वप्नीलने तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याला या भूमिकांसाठी तब्बल १५ किलो वजन कमी करावे लागले. यासाठी त्याने कडक डाएट आणि न चुकता भरपूर व्यायामही केला. कारण खेळाडूची भूमिका निभावत असताना त्याला खेळाडूसारखेच दिसणे, वागणे, चालणे गरजेचे होते यासाठी स्वप्नीलने एखाद्या खेळाडूची बॉडी लँग्वेज कशी असावी याचा अभ्यास केला आणि त्यासाठी कसरत सुरु केली. स्वप्नील सकाळी तीन तास कसरत आणि दुपारी तीन तास क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. शिवाय या खेळातील बारकावे, नियम हे सर्व त्याने आत्मसाद केले. जेणेकरून चित्रपटात तो कुठेही खोटा दिसू नये किंवा त्याचा खेळ खोटा वाटू नये. अगदी उन्हात, पावसात सुद्धा त्याने प्रॅक्टिस केली. आणि त्याच्या मेहनतीची पोचपावती म्हणजे तो कॅमेरासमोर अगदी खरा क्रिकेटर असल्यासारखा सहज वावरला.

 

 

“हे सर्व करणे एवढी मेहनत घेणे आमचे कामच आहे. कारण जर प्रेक्षकांना हे सर्व पडद्यावर पाहताना कुठेही खोटेपणा जाणवता कामा नये. प्रेक्षक एवढा विश्वास ठेऊन चित्रपट पाहायला जातात त्यांचा हिरमोड व्हायला नको. आणि या मायबाप प्रेक्षकांसाठी आम्ही जी मेहनत घेतो हे आमचे कर्तव्यच आहे. कारण आज आम्ही सर्व कलाकार जे काही थोडे फार आहोत ते फक्त याच प्रेक्षकांमुळे. आणि या सर्व मेहनतीचे श्रेय मी श्रेयश जाधवला देतो” असं स्वप्नील म्हणतो. येत्या १ फेब्रुवारी रोजी ‘मी पण सचिन’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Comments

More in Actor

To Top