Connect with us

मराठी कलाकार

स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच एकत्र,”ह्या”सिनेमात बनले एकमेकांचे मित्र!

Actor

स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच एकत्र,”ह्या”सिनेमात बनले एकमेकांचे मित्र!

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठीचित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका चतुरस्र अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या  भूमिकेत दिसणार आहे.

सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात… या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचा मित्र बनलेला संदीप पाठक यांचा वेगळाच लुक यामध्ये बघायला मिळत आहे. वेगळ्या गेटअप मधील संदिप पाठक तर या फोटोमध्ये कमालीचा वेगळा दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री यातून व्यक्त होत असून, त्यांच्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.

आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना संदीप पाठक म्हणाला की ‘मला अभिनेता म्हणून नेहमी असं वाटतं की चांगल्या कथानकात आपला सहभाग असावा, प्रत्येक पात्राला महत्व असलेला सिनेमा करायला मिळावा.उत्तम दिग्दर्शक, अनुभवी कलाकारांसोबत काम करतायावं, दर्जेदार प्रोजेक्टमधे आपला खारीचा वाटा असावा, माझ्या ह्या सगळ्या इच्छा “मोगरा फुलला”या सिनेमातून पूर्ण होत आहेत हे मी प्रेक्षकांना,वाचकांना नककी सांगु शकतो.मला ही संधी श्रावणीताई देवधर, स्वप्नील जोशी,कार्तिक सर आणि जीसिम्स प्रॉडक्शन्सने दिली’.

संदीप पाठक याने हरिश्चंद्राची फॅक्टरी, एकडाव धोबीपछाड, शहाणपण देगा देवा आणि एक हजाराची नोटयांसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. तर फू बाई फू, घडलंय बिघडलंय, असंभव, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अशा अनेक मालिकांतून त्यांनी काम केले आहे. तसेच ‘असा मी असामी, लग्नकल्लोळ, जादू तेरी नजर, ज्याचा शेवट गोड,सासू माझी धांसू’ या नाटकांतून अभिनय केला आहे.‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाच्या एकपात्री प्रयोगातून संदीप पाठक आपल्याला बघायला मिळाले आहेत. या त्यांच्या अभिनयामुळे एक चतुरस्र अभिनेता अशी संदीप पाठक यांची ओळख बनली आहे.

Comments

More in Actor

To Top