Connect with us

मराठी कलाकार

ओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्याला?वाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.

Actor

ओळखा बघू ह्या प्रसिद्ध अभिनेत्याला?वाचा त्याचा ह्या लूकमागचं कारण.

अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर बराच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतो. शिवाय फोटो आणि व्हिडिओसुद्धा तो शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेला फोटो फॅन्सच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यांत स्वप्नील महिला अवतारात पाहायला मिळत आहे. त्याने साडी परिधान केली असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे.

कृष्णाच्या भूमिकेपासून ते नुकतेच रुपेरी पडद्यावर झळकलेल्या मोगरा फुलला चित्रपटातील भूमिका, प्रत्येकवेळी स्वप्नील रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. लहानथोर आणि विशेषतः. तरुणींचा तो लाडका अभिनेता आहे. हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा स्वप्नील आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. त्याचा हा लूक आजच्या आघाडीच्या नायिकांनाही टक्कर देईल. हा फोटो शेअर करताना किप गेसिंग असं कॅप्शनही त्याने दिले आहे. त्यामुळे हा लूक म्हणजे स्वप्नीलची आगामी भूमिका आहे का असा प्रश्न सुरुवातीला फॅन्सना पडला.

सध्या सोशल मीडियावर साडी ट्विटर ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमुळेच स्वप्नीलने हा हटके फोटो शेअर केल्याचं बोललं जात आहे. मात्र या फोटो शेअर करण्यामागचं खरं कारण स्वप्नीलच सांगू शकेल. सध्या टिकटॉक ॲपवर व्हिडियो तयार करण्याचा ट्रेंड आला असून तरुण पिढी याच्या चांगलीच आहारी गेली असल्याचे दिसून येत आहे. मात्र या टिकटॉक ॲपमुळे काही बळी देखील गेले असल्याच्या घटना समोर येत असताना टिकटॉक जपून आणि केवळ मनोरंजनासाठी वापर करा असे आवाहन स्वप्नीलने केले आहे.

Comments

More in Actor

Like Us on Facebook

Popular Posts

To Top