Connect with us

मराठी कलाकार

बोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला “टकाटक”ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.

Movie Trailers

बोल्ड मराठी कॉमेडीने भरलेला “टकाटक”ट्रेलर.प्रथमेश परबचा अनोखा अंदाज.

टाईमपास या मराठीतील अजरामर सिनेमातून अभिनेता प्रथमेश परबला प्रचंड फॅन फॉलोविंग मिळाली होती. आता ‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘१२३४’ असे एका पेक्षा एक करमणूकप्रधान चित्रपट बनवणाऱ्या मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटात ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे पोस्टर चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या ट्रेलरची सगळीकडे खूप चर्चा होताना दिसते आहे.

या चित्रपटात प्रथमेशची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. त्यामुळं प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ‘टकाटक’ केमिस्ट्रीही या चित्रपटात अनुभवायला मिळेल. प्रथमेशने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत. ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे.

 

आजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कॉमेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. १०० टक्के शुद्ध विनोदांना प्रसंगांची अचूक जोड देत करण्यात आलेली विनोदनिर्मिती हा या चित्रपटाचा प्लस पाइंट आहे. सेक्स कामेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे तितकेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संदेशही या चित्रपटात देण्यात आला आहे.‘टकाटक’चा विषय तसा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top