Connect with us

मराठी कलाकार

‘तत्ताड’ सिनेमाचा इंटरेस्टिंग पोस्टर तुम्ही पाहिलात का?

Movie Teaser

‘तत्ताड’ सिनेमाचा इंटरेस्टिंग पोस्टर तुम्ही पाहिलात का?

‘तत्ताड’ या राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या टीजर पोस्टरमध्ये गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हाती क्लॅरोनेट असलेला वादक पहायला मिळतो. अत्यंत लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे.

चित्रपटात कलाकार कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, लक्षवेधी पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एंटरटेन्मेंटच्या जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित माने चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन, तर संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांनी गीतलेखन केलं आहे.

Comments

More in Movie Teaser

To Top