Connect with us

मराठी कलाकार

आदर्श सुनबाई साकारतायत आरजे ची भूमिका

Tejashri-Pradhan-Turns-RJ-with-Asehi-Ekda-Vhave

Movie Teaser

आदर्श सुनबाई साकारतायत आरजे ची भूमिका

अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणजे आता एक आदर्श सुनबाईच झालीये. हो ना! ‘होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतून सुनबाईची भूमिका साकारून तिने रसिकांच्या हृदयात जागा मिळवली. आता तेजस्वी ह्या सुनबाईच्या भुमिकेव्यतिरिक्त आणखी दुसऱ्या व्यक्तीरेखेत दिसणार आहे. आगामी ‘असेही एकदा व्हावे’ ह्या सिनेमात ती रेडिओ जॉकी (आरजे) ची भूमिका साकारतेय म्हणे. सिनेमांत उमेश कामत आणि तेजश्री प्रधान हि जोडी आपल्याला बघायला मिळेल.

एक वेगळीच भूमिका साकारून तेजश्रीने रसिकांना सुखद धक्का दिला आहे. पहिल्यांदा हि रेडिओ जॉकीची व्यक्तीरेखा करायला प्रोब्लम जाईल असं वाटतं होतं असं ती म्हणाली. पण ह्या भुमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली. आरजे होण्यासाठी लागणारे सगळे स्किल्स तिने शिकून घेतले. खऱ्याखुऱ्या रेडिओ स्टेशनलाच तिने यासाठी भेट दिली होती. एक फ्रेश अशी रोमँटिक कथा आपल्याला ह्या सिनेमाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. हा सिनेमा 6 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होईल.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Movie Teaser

Like Us on Facebook

Popular Posts

To Top