Connect with us

मराठी कलाकार

फोटो पाहून म्हणाल”अरेच्चा! हुबेहूब तेजस्विनी सारखी दिसणारी हि व्यक्ती आहे तरी कोण?”

News

फोटो पाहून म्हणाल”अरेच्चा! हुबेहूब तेजस्विनी सारखी दिसणारी हि व्यक्ती आहे तरी कोण?”

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री होण्याचा मान तेजस्विनी पंडितला मिळतो. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोत तेजस्विनीसह आणखी एक व्यक्ती दिसत आहे. अगदी तेजस्विनीसारखीच दिसणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तेजस्विनीची बहीण पूर्णिमा आहे. बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीनं खास शुभेच्छा दिल्या आहेत.

जीवनात तुमच्यासोबत कायमस्वरुपी काय असेल? डायमंड फक्त जाहिरातीत असतं, पैसा-प्रसिद्धी कायमस्वरुपी सोबत नसतात, मित्र कदाचित सोबत राहतील, प्रेम अटी शर्तींवर राहिल, पण मी आणि तू सारख्याच आहोत. आपलं दोघींवरील प्रेम असंच कायमच राहिल अशा हटके पद्धतीने तेजस्विनीने बहीण पूर्णिमाला शुभेच्छा दिल्या आहेत. रसिकांकडून आणि तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘तू ही रे’ असे सिनेमा, विविध नाटकं आणि ‘१०० डेज’ सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं या आधीच तेजस्विनीने जिंकली आहेत.

Comments

More in News

Like Us on Facebook

Popular Posts

To Top