Connect with us

मराठी कलाकार

ठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.

Movie Trailers

ठाकरे सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च.पाहण्यासाठी क्लिक करा.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित मच अवेटेड असलेल्या “ठाकरे” सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला आहे. हिंदी आणि मराठी भाषांमध्ये आज वडाळ्यातील कार्निव्हल आयमॅक्समध्ये हा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. ‘ठाकरे’ हा सिनेमा नसून शिवधनुष्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना ‘हिंदू हृदयसम्राट’ म्हटले जायचे. लाखो लोक त्यांची भाषणं ऐकण्यासाठी एकत्रित व्हायचे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने यावेळी बोलतांना म्हणाला कि “बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. बाळासाहेबांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. सर्वात कठीण काम अमृता राव हिने केली आहे. अमृता हिने माँ साहेबांची भूमिका केली आहे”. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ‘ठाकरे’ सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली. पुढील वर्षी 23 जानेवारी 2019 रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Comments
Continue Reading
Advertisement

More in Movie Trailers

To Top