Connect with us

मराठी कलाकार

“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.

Movie Trailers

“ती and ती”चा ट्रेलर आलाय भेटीला.पहा पुष्कर,प्रार्थना आणि सोनालीचा ट्रँगल.

मराठी चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी विविध विषयांच्या हटके मांडणीची मेजवानीच. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांचे विषय आणि त्यांची मांडणी यांचं स्वरुप खूपच बदललं आहे. अशाच एका वेगळ्या धाटणीचा एक चित्रपच लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. ‘ती and ती’ असं या चित्रपटाचं नाव असून सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहण्यास आतुर झाले होते. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मिडीयावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले, भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती and ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

‘ती and ती’ चित्रपटातील प्रमुख अभिनेता पुष्कर जोग याने काही दिवसांपूर्वी, ‘आम्ही तिघं लवकरच तुमच्या भेटीला येत आहोत’, अशी घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कोण तिघं आणि कधी हे त्याने स्पष्ट न केल्यामुळे प्रेक्षकांची याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली होती. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ती and ती’ अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही. पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. अशीच गोष्ट आहे अनयची (पुष्कर जोग) आणि त्याच्या आयुष्यातील दोन मुली म्हणजे सई आणि प्रियांका. प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिकेची हिंट मिळाल्यामुळे या प्रेमाच्या लव्ह ट्रँगलमध्ये त्यांची पुढची स्टेप काय असेल? हे जाणून घ्यायची उत्सुकता देखील नक्की वाढणार आहे.

एक हलकी-फुलकी, रोमँटिक कॉमेडी कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली असून आताची जनरेशन या सिनेमाचा पुरेपूर आनंद लुटतील याचा अंदाज या इंटरेस्टिंग ट्रेलरवरुन बांधता येऊ शकतो.या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा रसिकांना पाहायला मिळाणार आहे.

Comments

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top