Connect with us

मराठी कलाकार

स्वप्नपूर्तीसाठीचा खडतर प्रवास, पहा ‘तू तिथे असावे’ संगीतमय सिनेमाचा ट्रेलर.

Upcoming Movies

स्वप्नपूर्तीसाठीचा खडतर प्रवास, पहा ‘तू तिथे असावे’ संगीतमय सिनेमाचा ट्रेलर.

गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या एका युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास आगामी ‘तू तिथे असावे’ या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. कलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची. अर्थात स्वप्नपूर्तीचा हा प्रवास सोपा कधीच नसतो. आत्मविश्वासाच्या बळावर भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे ‘तू तिथे असावे’ सिनेमाद्वारे आपल्यासमोर मांडल्या जाणार आहे. भूषण प्रधान, पल्लवी पाटील या देखण्या जोडीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात आहेत.

नात्यांची सुरेख सांगड घालत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचे आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Upcoming Movies

To Top