Connect with us

मराठी कलाकार

‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशाची आई आहे चित्रपटसृष्टीचे महान खलनायक निळू फुलेंची मुलगी!

Actress

‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशाची आई आहे चित्रपटसृष्टीचे महान खलनायक निळू फुलेंची मुलगी!

खूपच कमी कालावधीत झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरली. मालिकेतील नवोदित अभिनेत्री गायत्री दातारसह सुबोध भावेच्या जोडीला प्रेक्षकांचेही भरपूर प्रेम मिळतंय. मालिकेतील ‘विक्रांत’ आणि ‘ईशा’ हि जरी प्रमुख पात्र असली, तरी ईशाच्या आईचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची आहे. मात्र थोडं थांबा तुम्हाला ईशाच्या आईची (सौ. निमकर यांची) भूमिका साकारणारी ही अभिनेत्री कोण आहे माहिती आहे का?

‘गार्गी फुले-थत्ते’ असे सदर मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव असून त्या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज खलनायक निळू फुले यांच्या कन्या आहेत. मालिकेत त्या एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारत आहे. आपल्या नशिबी आलेले दारिद्र आणि तडजोड मुलीच्या आयुष्यात येऊ नये म्हणून तिच्यासाठी श्रीमंत वर शोधण्याचे सध्या त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘तुला पाहते रे’ पूर्वी देखील काही मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actress

To Top