Connect with us

मराठी कलाकार

पार पडला ‘तुला पण बाशिंग बंधायचंय’ चा संगीत अनावरण सोहळा। आगामी सिनेमा।

Tula Pan Bashing Bandhaychay

News

पार पडला ‘तुला पण बाशिंग बंधायचंय’ चा संगीत अनावरण सोहळा। आगामी सिनेमा।

मुलगा किंवा मुलगी वयात आली म्हणजे मग पुढे तिच्या लग्नाचा विषय उभा ठाकतो. रूढी, परंपरा, चालीरीती ह्या सगळ्या जोखीमा अंगावर घेत हे विषय सोडवावे लागतात. असल्या सामाजिक प्रश्नांवर आधारित आगामी ‘तुला पण बाशिंग बांधायचय’ हा सिनेमा. ह्या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. तारुण्य, नंतर मग वैवाहिक जीवनातील समस्या, अपेक्षा, दृष्टिकोन इत्यादी विषयांवर सिनेमांत भाष्य करण्यात आले आहे.

Tula Pan Bashing Bandhachay Music Launch

हा सिनेमा 30 मार्चला रसिकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची निर्मिती दत्तात्रेय मोहिते, भानुदास व्यवहारे यांची आहे. सिनेमांत 5 गाणी असून ती सुहास सावंत, वैशाली माडे, प्रसन्नजीत कोसम्बी ह्यांनी गायली आहेत. विक्रम गोखले, यतीन कार्येकर, श्वेता खरात, भक्ती चव्हाण, सुवर्णा काळे, रितेश नगराले असे कलाकार सिनेमांत आहेत. सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्याला राज्यकर आयुक्त अन्वेषणच्या श्री चेतन भिंगारे यांची उपस्थिती होती. तसेच ह्या सिनेमाला ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री मा. पंकजा मुंढे यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top